शरद पवार, राहुल गांधी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि.१९) दिल्ली येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात महत्त्व पूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती झाली तसेच महाराष्ट्रात वंचित बहुजन विकास आघाडीची भारिप बहुजन महासंघ, एआयएमआयएम आणि जेडीएस यांनी युती केल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलाच फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती आखत आहेत.
दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.