बेरोजगार हार्दिक पटेल ……
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला आहे. नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ भाजपच्या अनेक मंत्र्यांनी, खासदार, आमदार आणि नेत्यांनीही आपल्या नावापुढे चौकीदार शब्द लावला. नरेंद्र मोदींच्या या मोहिमेला पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी ‘बेरोजगार हार्दिक पटेल’ असे प्रत्युत्तर दिले आहे.
हार्दिक पटेल यांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवर ‘बेरोजगार हार्दिक पटेल’ असे लिहिले आहे. हार्दिक पटेल यांच्यानंतर अनेक तरुणांनीही आपल्या नावापुढे बेरोजगार शब्द जोडला आहे.
काही दिवसापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात चौकीदार चोर है, अशी टीका केली. राहुल गांधी यांच्या टीकेनंतर रविवारी मोदींनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार असा शब्द जोडला आहे.