‘लवकर चाचणी, उपचार आणि रुग्णालयातून सुटी’ या त्रिसूत्रीवर मुंबई महापालिकेचा भर
मुंबई, दि.२३: उत्सवांमुळे वाढलेली गर्दी, गावावरून मुंबईत परतणारे लोक यामुळे कोविडचा संसर्ग पसरण्याची भीती आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने पालिकेने खबरदारी घेतली आहे.
‘लवकर चाचणी, उपचार आणि रुग्णालयातून सुटी’ या त्रिसूत्रीवर पालिकेनं भर दिला आहे. मुंबईतील गर्दीची ठिकाण तसच दाटीवाटीच्या परिसरातील २६६ लसीकरण केंद्रांवर आरटी-पीसीआर चाचण्या केल्या जात आहेत.
बाहेरगावावरून मुंबईत आलेल्या लोकांच्या सर्वेक्षणासाठी स्वयंसेवकांच पथकही तैनात करण्यात आल आहे. लोकांनी वेळीच चाचणी करून घ्यावी असं मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.
