DGCA कडून मिळाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चिपी विमानतळ चालविण्याचा परवाना
सिंधुदुर्गवासियांचं विमान प्रवासाचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी इथं उभारण्यात आलेला विमानतळ चालविण्यासाठी आय आर बी कंपनीला नागरी हवाई वाहतूक महासंचालकांकडून परवाना मिळाला आहे. त्यामुळे या विमानतळावरून विमान उड्डाणाचा मार्ग खुला झाला आहे. या परवान्यामुळे आता कंपनीला नवीन विमान सेवा सुरु करता येणार आहे. एअरलाइन्स आणि सामान्य लोकांसाठीदेखील सेवा सुरु करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, अशी माहिती आय आर बी कंपनीकडून काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या विमानतळाचं उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबरला हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
