Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

घारापुरी ठरणार १००% लसीकरण करणारे उरण तालुक्यातील पहिले गाव

घारापुरी ठरणार १००% लसीकरण करणारे उरण तालुक्यातील पहिले गाव

उरण, दि. १९(विठ्ठल ममताबादे): कोरोनाचा भविष्यकाळातील तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. सदरची बाब लक्षात घेऊन ही लस आपल्या गावातच मिळावी म्हणुन घारापूरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर यांच्या प्रयत्नातून आणि राजिप सदस्य विजय भोईर यांच्या सहकार्याने दि. १८ सप्टेंबर २०२१ रोजी आरोग्य उपकेंद्र घारापुरी येथे ग्रामपंचायतीचे माध्यमातून गावातील १८ वर्षांवरील नागरीकांसाठी कोविल्डशीलचे डोस उपलब्ध करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या डोस आणि दुसऱ्या डोस मध्ये अनुक्रमे ३० व १०८ ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सदस्या तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच तालुका आरोग्य अधिकारी उरणचे डॉ. ईटकरे, वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्र कोप्रोली डॉ. भोसले, निलेश झावरे त्यांचे सहकारी या सर्वांचे सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या वतीने मनापासुन आभार मानले.
तसेच १८+ वयोगटावरील लवकरच १००% लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर यांनी सांगितले.
त्यामुळे घारापुरी येथे नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केले जात असून ग्रामपंचायतीचे नागरिकांनी आभार मानले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *