मनोहर पर्रिकर यांच्या अंत्यदर्शनावेळी स्मृती इराणींना अश्रू अनावर
पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दोनापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक भाजपाच्या नेत्यांनी आज पणजीमध्ये पर्रिकरांचे अंतिम दर्शन घेतले. पर्रिकर यांच्या अंत्यदर्शना वेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना आश्रू अनावर झाले.
मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव कला अकादमीत अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले होते. स्मृती इराणी यांनी देखील पणजीत मनोहर पर्रिकरांचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र पर्रिकर यांचे पार्थिव पाहताच इराणी भावूक झाल्या. शासकीय आणि लष्करी इतमामात मनोहर पर्रिकर यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.