Priyanka Gandhi
मोदींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा प्रचार, प्रियांका गाधींची आजपासून गंगा यात्रा
काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यातुन काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. प्रियांका गांधी आज गंगा यात्रा करणार आहेत.
प्रयागराजहुन वाराणसीपर्यंत गंगा नदीतून मोटारबोटद्वारे त्याच्या गंगा यात्रेला सुरुवात होणार आहे. तीन दिवसांच्या यात्रेदरम्यान प्रियांका गांधी १४० किलोमीटरचे अंतर पार करणार आहेत. या यात्रेवेळी प्रियांका गांधी जनतेशी संवाद साधणार आहेत. या यात्रेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदार संघ असलेल्या वाराणसीमध्ये होणार आहे.
