शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खतांवरील अनुदान वाढणार
पालाश आणि स्फूरद खतांवरील पोषण आधारित अनुदान वाढवण्यात आलं आहे. डीएपी खतांवरील सध्या देण्यात येत असलेलं ७०० रुपये अनुदान वाढवून १२०० करण्यात आलं आहे. याबाबतच्या प्रस्तावाला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडवीया यांनी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं.
शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगून त्यामुळे सरकारी तिजोरीवर १४ हजार कोटी रुपयांचं अतिरिक्त ओझं पडेल असं ते म्हणाले. सरकार युरियाच्या प्रत्येक पाकिटावरही ९०० रुपये अनुदान देत असल्याचं मांडविया यांनी यावेळी सांगितलं.
