१० अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती
मुंबई, दि.२८: मुंबई उच्च न्यायालयात १० अतिरिक्त न्यायाधीश नियुक्त करण्यात आल्याचे विधी व न्याय विभागातर्फे घोषित करण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 217 च्या कलम 1) ने बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करीत पुढील प्रमाणे न्यायाधीशांची नियुक्त करण्यात आली आहे.
एस / श्री न्यायमूर्ती अविनाश गुणवंत घरोटे, नितीन भगवंतराव सूर्यवंशी, अनिल सत्यविजय किलोर, मिलिंद नरेंद्र जाधव, मुकुंद गोविंदराव सेवलीकर, वीरेंद्रसिंह ज्ञानसिंह बिष्ट, देबद्वार भालचंद्र उग्रसेन, श्रीमती मुकुलिका श्रीकांत जवळकर, सुरेंद्र पंढरीनाथ तावडे आणि नितीन रुद्रसेन बोरकर या मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशांची, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यासंदर्भातील अधिसूचना विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाने जाहिर केली.
