पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला घाबरतात – राहुल गांधी
पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावास चीनने विरोध केला, या प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरवरुन टीका केली आहे.
नरेंद्र मोदी चीनच्या अध्यक्षांना घाबरतात असा असा टोला त्यांनी मोदींना लगावला आहे. राहुल गांधींनी असे ट्विट केलं आहे की, ‘दुबळे पंतप्रधान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात. चीन जेव्हा कधी भारताविरोधात कारवाई करेल तेव्हा आपले पंतप्रधान मौन बाळगून गप्प बसतील.’
पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत झोके खेळतात, दिल्लीत जाऊन गळाभेट घेतात आणि चीनमध्ये गेल्यावर त्यांच्यासमोर झुकतात. असंही पुढे राहुल म्हणाले आहेत.
Weak Modi is scared of Xi. Not a word comes out of his mouth when China acts against India.
NoMo’s China Diplomacy:
1. Swing with Xi in Gujarat
2. Hug Xi in Delhi
3. Bow to Xi in China https://t.co/7QBjY4e0z3
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 14, 2019
