महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन येथे ध्वजवंदन
मुंबई, दि.१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवन मुंबई येथे राष्ट्रध्वज फडकवला तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी सामूहिक राष्ट्रगीतगान झाले. राज्यपालांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व पोलिसांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
