लवकरच रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या मार्गावर?
काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे दिग्गज नेते माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे लवकरच भाजप मध्ये दाखल होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
भाजपचे नेते गिरीश महाजन आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात आज शिवनेरीवर भेट घडून आली. सुजय विखे पाटील यांच्या पाठोपाठ रणजित सिंह मोहिते पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
मात्र गिरीश महाजन यांनी रणजित सिंह मोहिते पाटलांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेबाबत नकार दर्शविला आहे. गिरीश महाजन आणि रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहे.
