गुजरातमधील पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलनात अग्रेसर असणारे हार्दिक पटेल आज अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः हार्दिकने प्रसार माध्यमांना दिली. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाल्यानंतर पक्षाच्या जाहीर सभेत ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्याने सांगितले .
आज मी काँग्रेसशी जोडला जाणार आहे. याच काँग्रेसचे नेतृत्व पंडित जवाहलाल नेहरु, सरदार पटेल, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी केले. त्यांचा आर्दश ठेवत मी भारताला सक्षम बनवण्यासाठी काम करणार आहे.
गुजरातमध्ये पाटीदारांचे प्रतिनिधीत्व करणारा हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करुन मोदींचा त्यांच्याच राज्यात पराभव करण्याचा प्रयत्न करत आहे.
