नाशिक पोलिसांची कारवाई; गुटखा आणि सुगंधीत तंबाखूसह सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
नाशिक: राजस्थान मधून सापुतारा मार्गे नाशिक इथं येणारा गुटख्याचा मोठा साठा काल नाशिक पोलिसांनी जप्त केला. दिंडोरी तालुक्यात वणी इथं दोन कंटेनर अडवून तपासणी केली असता, यामधून सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक होत असल्याचं दिसून आलं.
पोलिसांनी दोन्ही कंटेनर, प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधीत तंबाखू असा सुमारे एक कोटी २४ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
