मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होईल – सुरेश प्रभू
रत्नागिरी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी अमलात आणल्या आहेत, त्यामुळे सध्या सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर, लवकरच तोडगा निघेल असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे. ते काल रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलत होते.
यावेळी प्रभु यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या अनेक सवलती आणि राबवलेल्या योजनांची माहिती वार्ताहरांना दिली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रगतीची माहितीही त्यांनी दिली. हे काम पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
