“राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये” – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई: राज्यात लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय झालेला नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. आगामी काळात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी काही निर्बंध घालण्याबाबत विचार सुरु असल्याचं ते म्हणाले राज्यातल्या कोरोनास्थितीविषयी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यातली कोरोनास्थिती इतर राज्याच्या तुलनेत समाधानकारक असून यापुढे ज्या घटकांकडून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो त्यांच्या चाचण्या करण्यावर भर दिला जाणार असल्याचं ते म्हणाले.
Source – AIR
