नवीन कृषी सुधारणा कायद्यांबाबत काँग्रेसकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याची प्रकाश जावडेकर यांची टीका
नवी दिल्ली, दि.२८: नवीन कृषी सुधारणा कायद्यांबाबत काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या या डावपेचांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असं जावडेकर म्हणाले.
काँग्रेस पक्षाने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात या सुधारणांचा उल्लेख केला होता, याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधलं.
https://twitter.com/PrakashJavdekar/status/1310432579812642816?s=19
