ऑक्सफर्ड युनिवर्सिटी आणि सिरम संस्थेतर्फे कोविड-१९ वरच्या लसीची तिस-या टप्प्यातली मानवी चाचणी पुढल्या आठवड्यापासून सुरु
ऑक्सफर्ड युनिवर्सिटी आणि सिरम संस्थेतर्फे निर्माण केल्या जात असलेल्या कोविड-१९ वरच्या लसीची तिस-या टप्प्यातली मानवी चाचणी पुढल्या आठवड्यापासून पुण्यात सुरु होणार आहे. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी आज ही माहिती दिली.
कोविशिल्ड या लसीची तिस-या टप्प्यातली चाचणी ससून रुग्णालयात सोमवारपासून सुरु होण्याची शक्यता आहे. दीडशे ते दोनशे स्वयंसेवकांवर ही चाचणी होणार असून, अनेकजण यासाठी स्वयंप्रेरणेनं पुढे आले आहेत, असंही तांबे यांनी सांगितलं. रुग्णालयानं स्वयंसेवकांची नोंदणीही सुरु केली आहे.
Source – AIR