येत्या २५,२६ ला होणार प्रसारित होणार मुलाखत
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गेल्याच आठवड्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. ही मुलाखत दोन भागांत प्रसारित झाली होती. यावेळी शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलखुलास पणे दिली. त्याचा धर्तीवर राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून या आठवड्याच्या शेवटी ती प्रसारित होणार आहे.
या संदर्भात फेसबुक च्या माध्यमातून खासदार राऊत यांनी एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे मिळाली…
उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोना पासून राम मंदिरा पर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले..
मुलाखत २५,२६ जुलै रोजी वाचता पहाता येईल.”
