काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांची युवासेनेतून हकालपट्ट
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादयांनी हल्ला केला होता. यात भारताचे ४१ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाणीचे प्रकार घडत होते.
पुलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळमधील वाघापूर परिसरातील वैभवनगर येथे बुधवारी रात्री १० ते १५ तरुणांनी काश्मिरी विद्यार्थ्यांवर ‘वंदे मातरम, भारत माता की जय’ म्हणण्याची सक्ती केली. ‘काश्मीरला परत जा’ असे बजावत या सर्वांना मारहाण करण्यात आली होती.
या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांची युवासेनेतून हकालपट्टी केली आहे.
As of last evening, the Party has sacked those involved in the act. J&K is a part of India and no Indian, or for that matter, nobody should face the brunt of anger that is towards terrorism. We understand the angst but it must be against terror, not innocent people.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 22, 2019
यवतमाळ जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी अजिंक्य मोटके आणि त्याच्या दोन कार्यकर्त्यांना संघटनेतून काढून टाकण्यात आले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. तसेच आपला राग हा दहशतवादाविरुद्ध आहे. निरपराध लोकांवर राग काढणं योग्य नाही, असेही युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
