राज्यातील जिल्ह्यांमधील ५५७ ग्रामपंचायतींसाठी २४ मार्चला मतदान
महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमधील ५५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी २४ मार्च २०१९रोजी मतदान होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, पालघर आणि सिंदखेडराजा या तीन नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ मार्च 2019 रोजी मतदान होणार असून ते सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी होईल.
सरपंच पदासाठी मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. त्याचप्रमाणे सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे 5 ते 9 मार्च 2019 या कालावधीत स्वीकारले जाणार असून त्याची छाननी 11 मार्च 2019 रोजी होईल. 13 मार्च 2019 रोजी निवडणूक चिन्ह वाटप होईल.
