कोरोनाचे संकट दीर्घकाळ राहण्याची शक्यता असल्याने राज्यसरकार टाळेबंदी उठवण्याची घाई करणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
मुंबई: कोरोनाचे संकट दीर्घकाळ राहण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यसरकार टाळेबंदी उठवण्याची घाई करणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कोरोना प्रादुर्भावाची राज्यातली सद्यस्थिती, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेली तयारी आदींची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादकांशी अनौपचारिक संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही भूमिका व्यक्त केली. कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या गाठण्याच्या जवळपास राज्य पोहोचलं असून, ३१ तारखेला केंद्र सरकार टाळेबंदीबाबत काय निर्णय घेईल, त्यावरही हा निर्णय अवलंबून असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
Source – AIR
