नवे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्वीकारला पनवेल महानगरपालिकेचा कार्यभार
पनवेल: उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त राहिलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुधाकर देशमुख यांनी आज पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून मावळते आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. गणेश देशमुख यांची ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती जवळपास निश्चित असल्याचे म्हंटले जाते.
उल्हासनगर महानगरपालिकेचा कार्यभार आता समीर उन्हाळे पाहणार आहेत.
