पनवेल तालुक्यातील उलवे नोड मधील ‘ही’ ठिकाणं जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित
पनवेल/उलवे : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ज्या क्षेत्रांत कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत ती ठिकाणं जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. आज यात विशेषतः उलवे नोड मधील गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश आहे.
वाचा या क्षेत्रांचा संपूर्ण तपशील
१) उलवे ता. पनवेल येथील प्लॉट नं. ५० बी, सेक्टर-०८, स्वस्तिक आदिनाथ सोसायटी ही संपूर्ण इमारत
२) उलवे ता. पनवेल येथील प्लॉट नं. २००, सेक्टर-१७, श्री दर्शन बिल्डिंग ही संपूर्ण इमारत
३) उलवे ता. पनवेल येथील प्लॉट नं. १०७, सेक्टर-२१, त्रिमूर्ती रेसिडेन्सी, ए विंग ही इमारत
४) उलवे ता.पनवेल येथील प्लॉट नं. ६४, सेक्टर-५ येथील रेडियन्स स्प्लेन्डर को.ऑ.हौ.सो., सी विंग, ही संपूर्ण इमारत
करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील २८ दिवस वरील सर्व ठिकाणं Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ७१, १३९ तसचे भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.
