पुण्यातल्या ७० हजार कुटुंबांना अन्नधान्याची पाकिटं पुरवली जातील : आयुक्त शेखर गायकवाड
पुणे: पुण्यात सध्या कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातल्या कोविड१९ च्या प्रभावाखालच्या प्रतिबंधित क्षेत्रात गर्दी टाळण्याच्या दृष्टीने महानगरपालिका घरोघरी धान्यपुरवठा करणार आहे.
कोणालाही रस्त्यावर यायला लागू नये याकरता सुमारे ७० हजार कुटुंबांना अन्नधान्याची पाकिटं पुरवली जातील असं आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं. पुण्यात आतापर्यंत २ हजार १४० रुग्ण आढळले आहेत.
Source – AIR
