पनवेल विभागात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत चिंताजनक वाढ, एका दिवसात १२ लोकं निघाली पॉसिटीव्ह
पनवेल: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज कोविड-१९ रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. आज एकुण १२ नव्या रुग्णांची नोंद या विभागात झाली. यातल्या बहुसंख्यांक रुग्णांना घरातल्या एका पॉसिटीव्ह व्यक्तींकडून संक्रमण झाल्याचे प्रथमदर्शनी पहावयास मिळतेय.
यात कामोठे विभागात ४, नवीन पनवेल विभागात ४, खारघर विभागात २ तर कळंबोली विभागात २ लोकांच्या कोरोना चाचण्या सकारात्मक आल्या आहेत.
पनवेल विभागात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५१ वर पोहीचला आहे तर आतापर्यंत २८ जणं पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.
संपूर्ण तपशील पहा

