यूपीतील साधू हत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री योगींजवळ व्यक्त केली चिंता; दोषींना कडक शिक्षेची केली अपेक्षा
आज पहाटे उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जवळ एका गावात दोन साधूंची निघृण हत्या करण्यात आली. गावातीलच एका इसमाने पूर्ववैमनस्य मनात ठेवत या दोघांची हत्या केली. यानंतर गावाला छावणीचे स्वरूप आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून चिंता व्यक्त केली. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे दिली. ते म्हणाले की, “मी आत्ता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath जी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.” पुढे या प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त करत सदर घटनेला धार्मिक रंग न देण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
मी आत्ता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath जी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2020
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका दुर्गम गावात १२ दिवसांपूर्वी २ साधूंची व त्यांच्या ड्रायव्हर चा हिंसक जमावाने निघृण खून केला होता. यानंतर सरकारने १०० च्या वर आरोपींना तात्काळ अटक केली होती ज्यात काही अल्पवयीन आरोपीही होते.
