Amitabh Bachan Twit
बॉलीवूड चे सुपरस्टार अमिताभ बच्चन ह्यांचं सोशल मीडिया प्रेम सर्वांनाच परिचित आहे. त्यांच्या हटके पोस्ट साठी ते चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक ब्लॅक अँड व्हाइट मध्ये असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनेत्री श्रीदेवी, आमीर खान आणि सलमान खान दिसत आहेत. 6 फ्रेबुुवारीला इन्स्टाग्रामवर अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवी, आमीर खान आणि सलमान खान यांच्यासोबतचा 1989 मध्ये काढलेला फोटो शेअर केला आहे.
लंडन येथील फुटबॉलच्या वेम्बेली स्टेडियममध्ये कॅान्सर्टच्या सरावाच्यावेळी काढलेला हा एक दुर्मिळ फोटो आहे. ‘जुम्मा-चुम्मा’ हा माझा पहिला कॉन्सर्ट होता. असं त्यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना नमूद केलं आहे. वेम्बेली स्टेडियममध्ये होणाऱ्या कॅान्सर्ट मध्ये मी सहभागी झालो होतो. त्यावेळी मी माझ्यासोबत श्रीदेवी, सलमान खान आणि आमीर खानला यांना घेऊन गेलो होतो. ‘जुम्मा-चुम्मा’ हा कॅान्सर्ट बघण्यासाठी त्यावेळी जवळपास 70 हजार प्रेक्षक आले होते.
अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोला आमीर खानने प्रतिक्रिया दिली आहे. ‘आयला! अमर आणि प्रेम दोन एका लिजेंड्ससोबत, ते ही फुटबॉलच्या वेम्बली स्टेडियमवर! फोटो शेअर केेल्याबद्दल तुमचे मनापासून आभार…असं आमीरने लिहिलं आहे.
https://www.instagram.com/p/BthrwhahDSG/?utm_source=ig_web_copy_link
https://twitter.com/aamir_khan/status/1093171667751161857
