Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ईडीकडून पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना नोटीस

Rahat Fateh Ali Twitter 7

परकीय चलन बेकायदेशीरपणे भारताबाहेर नेल्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी)
पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना नोटीस बजावली आहे.

२०११ मध्ये दिल्लीतील विमानतळावर राहत फतेह अली खान यांची तपासणी करण्यात आली
होती. विमानतळावर राहत फतेह अली खान यांची तपासणी केली असता महसूल गुप्तवार्ता
संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना १.२४ लाख अमेरिकी डॉलर सापडले होते.
परकीय चलनाची तस्करी केल्याचा राहत फतेह अली खान यांच्यावर महसूल विभागाचा संशय
आहे. या प्रकरणातबद्दल राहत फतेह अली खान यांना आता ईडीने कारणे दाखवा नोटीस बजावली
आहे. ईडीच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देण्यात अपयशी ठरल्यास राहत फतेह अली खान
यांच्याकडून ३०० टक्के दंड आकारला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या महितीच्या आधारे,
भारतात त्यांना लूक आऊट नोटीस देखील बजावली जाऊ शकते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *