Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोब्रापोस्ट चे डी.एच.एफ.एल. समूहावर गंभीर आरोप

Cobrapost DHFL Scam

कोब्रापोस्ट या संकेतस्थळाने डीएचएफएल या हाऊसिंग फायनान्स कंपनीने हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा
आरोप केला आहे. कोब्रापोस्ट यांच्या रिपोर्टनुसार ३१,५०० कोटींचा घोटाळा बोगस कंपन्यांच्या आधारे डीएचएफएलच्या
प्रवर्तकांनी केला आहे.

डीएचएफएलच्या प्रवर्तकांनी बोगस कंपन्यांना डीएचएफएलने कर्ज दिलं असल्याचं दाखवलं आहे आणि नंतर परत
प्रवर्तकांकडे हीच रक्कम जमा करण्यात आली. अशाप्रकारे डीएचएफएलच्या प्रवर्तकांनी कथित रूपात विविध बनावट
कंपन्यांद्वारे ३१,५०० कोटींचा घोटाळा केला आहे. या घोटाळयातील पैशांच्या सहाय्याने भारतासह दुबई, मॉरिशस,
श्रीलंका,इंग्लंडमध्ये संपत्ती खरेदी केली.

डीएचएफएल समूहाला ३२ भारतीय आणि विदेशी बँकांनी सुमारे ९७,००० कोटी रुपये कर्जरूपात दिले आहेत.
डीएचएफएलच्या प्रवर्तकांनी तयार केलेल्या बनावट आणि छद्म कंपनीचे संचालक, तसेच त्या कंपनीचे पत्ते एकसारखेच
असल्याचा आरोप कोब्रापोस्ट या संकेतस्थळाने केला आहे. कोब्रापोस्ट या संकेतस्थळाच्या मते, हा देशातील सर्वात
मोठा वित्तीय घोटाळा आहे.

कोब्रा पोस्टच्या अहवालानुसार, भाजपाला डीएचएफएलने २० कोटी रुपयांचा निधीही दिला होता. मात्र यासंबंधी कोणता
ही खुलासा डीएचएफएलने कधीच केला नाही. ही बातमी समोर येताच डीएचएफएलचे शेअर आठ टक्क्यांनी घसरले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *