Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मेहुल चोक्सीला भारतात पाठवण्यास अँटिग्वा सरकारचा नकार

Mehul-Choksi-Scam-1

मेहुल चोक्सीला भारतात पाठवण्यास अँटिग्वा सरकारचा नकार

पंजाब नॅशनल बँकेची फसवणुक करून भारत सोडून पळून गेलेला मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणणे आणखीन अवघड होऊन बसले आहे. आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी भारत सरकार खूप प्रयत्न करत असल्याचे सरकारकडून सातत्याने माध्यमांना सांगितले जात आहे.

अँटिग्वाच्या पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी लियोनेल हर्स्ट यांनी वृत्तवाहिनीवर बोलताना असे सांगितले की, चोक्सी आता अँटिग्वाचा नागरिक. आहे आणि इथले सरकार त्याची नागरिकता हिसकावून घेऊ शकत नाही. चोक्सीला आता भारतात परत पाठवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चोक्सीला भारतात आणणे आता कठीण झाले आहे. तसेच भारत सरकारचे कोणतेही अधिकारी आमच्या देशात मेहुल चोक्सीला घेण्यासाठी आले असल्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही असेही ते म्हणाले.
काही माध्यमांतील वृत्तानुसार, मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी सीबीआय आणि ईडीचे काही अधिकारी अँटिग्वाला जाणार होते तसेच त्याला भारतात आणण्यासाठी एअर इंडियाचे बोईंग विमान पाठवण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *