विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी
राहुल गांधी यांचे पुण्यात आगमन
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आज पुण्यातील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधणार आहेत.
हडपसर येथे अखिल भारतीय युवक काँग्रेस आणि युवा स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांबरोबर संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किमान पाच हजार विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना ते उत्तरे देणार आहेत.
पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा कोणत्याच प्रकारे राहुल गांधी प्रचार करणार नसल्याचे कळते.
गुरुवारी रात्री लोहगाव विमानतळावर राहुल यांचे आगमन झाले. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकसभेचे पुण्यातील उमेदवार मोहन जोशी यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.
