Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वाराणसीमध्ये मोदींविरोधात लढणार ही व्यक्ती निवडणूक लढवणार

वाराणसीमध्ये मोदींविरोधात लढणार ही व्यक्ती निवडणूक लढवणार

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद निवडणूक लढविणार आहेत. महाआघाडी मोदींविरोधात आव्हान उभं करू शकत नाही म्हणून मी उभं राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं आझाद यांनी म्हटलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.तर भीम आर्मीने शनिवारी वाराणसीतून मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत आझाद हे स्वत: सहभागी होणार असल्याचे भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन यांनी सांगितले. यंदाच्या लोकसभेला मी एक अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहणार आहे. आपल्या देशाला दुबळा करणारा व्यक्ती उत्तर प्रदेशमधून सहज जिंकून यावा असे मला वाटत नाही. मी या आधीच स्पष्ट केले आहे की, मायावती, मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव हे जर वाराणसीतून निवडणूक लढवणार नसतील तर मी वाराणसीतून उभा राहीन. मोदींविरोधात एक सशक्त उमेदवार उभा राहणे आवश्यक होते. पण तसे दिसत नव्हते. मी मोदींना सहज जिंकू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.चंद्रशेखर आझाद विरुद्ध मोदी या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *