Majhya Navaryachi Bayko
झी मराठी वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक होत चाललीय. राधिका सुभेदारनेे शनायाला आपली सवत म्हणून घरी आणलं. राधिका आणि तिची सासू या दोघींनी मिळून शनायाला चांगलंच कामाला लावलंय. राधिकाच्या कारस्थानांना शनाया जाम वैतागली आहे आणि ती सगळा राग गुरूवर काढतेय. आपण घरातील काहीच कामे करणार नाही, असं तिनं गुरूला ठणकावून सांगितलंय.
गुरूला दोन महिन्यांनी घटस्फोट हवाय. त्यामुळे राधिकाचं प्रत्येक म्हणणं गुरूला मान्य करावं लागतंय. राधिकाने शनायाला बकुळामावशी सुट्टीवर असल्यानं कपडे धुवायला सांगितले. शनाया कपडे धुवायला सुरूवात करते. त्याचवेळी शनायला गुरूचा फोन येतो. गुरु तिला मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय ते बघायला घरा बाहेर येण्यास सांगतो, तेव्हा शनया खुश होत नळ चालू ठेवून घराबाहेर धावत जाते. नळ चालू असल्यामुळे ओव्हरफ्लोव होऊन सर्व सोसायटीमध्ये पाणी साचतं. तेवढ्यात राधिका ऑफिस मधून घरी येते. सोसायटीतील सर्वजण राधिका जवळ शनायाची तक्रार करतात.
आता राधिका शनायाला काय शिक्षा देते हे पाहणं अधिक मजेशीर आहे.
