Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्‍ट्रवादीची पूनम महाजन यांना सवाल करत पोस्टरबाजी

NCP Clock PNG

राष्‍ट्रवादीची पूनम महाजन यांना सवाल करत पोस्टरबाजी

3 फेब्रुवारी रोजी चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर आयोजित केलल्या युवा महासंगमच्या जाहीर सभेत भाजप खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तसेच पवार म्हणजे रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी मामासारखे आहेत असे देखील पूनम महाजन यावेळी बोलल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पूनम महाजन यांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘अहो चिऊ ताई, देश की जनता यह जानना चाहती है?, प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा?’, असा प्रश्न पोस्टरच्या माध्यमातून विचारत हे पोस्टर मुंबईमध्ये ठिकठिकाणी लावले आहेत.

मुंबईतील पार पडलेल्या सीएम चषक कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष आणि भाजप खासदार पूनम महाजन यांनी शरद पवार यांच्यावर जी टीका केली होती त्याच टिकेला राष्‍ट्रवादी काँग्रेसने पोस्‍टरच्या माध्यमातून खासदार पूनम महाजन यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *