Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा भाजपा मध्ये प्रवेश

Laxman Dhoble 2

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोमवारी जालना येथे भाजपमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीमध्ये असताना लक्ष्मणराव ढोबळे यांनी उस्मानाबादमधून लोकसभा निवडणूक लढवली होती.
गेल्या लोकसभा निवडणुकी वेळी मात्र राष्ट्रवादीने लक्ष्मणराव ढोबळेंना मोहोळमधून तिकीट दिले नाही.
त्यामुळे ढोबळे राष्ट्रवादीवर नाराज होते. याच काळात ढोबळेंची भाजप नेत्यांशी मैत्री वाढत गेली.
काही अडचणींमुळे ढोबळे यांना भाजप मध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त लागत नव्हता, त्याचवेळी केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी सोलापुरात आले होते. तेव्हाच लक्ष्मण ढोबळे यांनी सहकारमंत्री
सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पाया पडल्याचा फोटो व्हायरल झाले होता.
भाजपमध्ये मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन असे ढोबळे यांनी यावेळी सांगितले.
आता सोलापूर लोकसभा निवडणुकीत ढोबळे यांना भाजपकडून तिकीट मिळणार की नाही ही
चर्चा सध्या चांगलीच रंगते आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *