Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा

Trophy 1

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा…

दरवर्षी महाराष्ट्र शासन नाटक, लोककला, मराठी चित्रपट, कीर्तन, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, शाहिरी, नृत्य, तमाशा, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करते.

यावर्षीच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या घोषणेचा शासन निर्णय आज प्रसिध्द करण्यात आला आहे.

नाटक विभागासाठी रवी पटवर्धन, लोककलेसाठी मोहन कदम, मराठी चित्रपटासाठी उषा नाईक, कीर्तनासाठी ह.भ.प. विनोदबुवा खोंड, कंठसंगीतासाठी श्रीमती माधुरी विश्वनाथ ओक, उपशास्त्रीय संगीतासाठी श्याम देशपांडे, शाहिरीसाठी शाहीर विजय जगताप, नृत्यासाठी श्रीमती माणिकबाई रेंडके, तमाशासाठी श्रीमती चंद्राबाई अण्णा आवळे, आदिवासी गिरीजनसाठी श्रीमती वेणू बुकले, कलादानसाठी श्रीकांत धोंगडे आणि वाद्यसंगीतासाठी पं.प्रभाकर धाकडे यांना या वर्षीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहिर झालेला आहे. या पुरस्काराचे रु. १ लाख रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरुप आहे. २०१८ च्या पुरस्कारांसाठी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीने या मान्यवरांची शिफारस केली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *