Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे उदयनराजे झाले भावुक

Udayaraje 2

आक्रमकपणा, डायलॉगबाजी किंवा हटके स्टाईल या गोष्टींमुळे साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले नेहमीच चर्चेत असतात. उदयनराजे कार्यकर्त्यांसमोर भावूक झालेत असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कार्यकर्त्यांचं आपल्या बद्दलच प्रेम पाहून उदयनराजे भावूक झाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

उदयनराजे एका गाडीत येऊन बसताच गाडीतील एका समर्थकाने त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी रचलेलं ‘आले रे, आले रे उदयनराजे’ हे गाणं सुरु केलं. गाणं ऐकताना उदयनराजे यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी तयार केलेलं गाणं ऐकताना उदयनराजे भावूक झालेले या व्हिडीओमध्ये दिसतात.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *