Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर मातोश्रीवर

Prashant-Kishor-FB-Cover-Web

निवडणुकीच्या काळात शिवसेनेची प्रशांत किशोर यांच्याकडे प्रचाराची धुरा

2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रर्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आज शिवसेनेच्या खासदारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. मातोश्रीवर झालेल्या या बैठकीत प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांना लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेच्या खासदारांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

प्रशांत किशोर हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची धुरा सांभाळणार आहेत. 2019 च्या निवडणुकीसाठी शिवसेनेने हा आक्रमक पवित्रा घेतल्याने युतीचं काय होणार, हा प्रश्न आता सर्वांना पडलाय. 2014 मध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मिळवून दिलं होते. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांना देखील मदत केली होती. सध्या प्रशांत किशोर हे जनता दल युनायटेड या पक्षाचे उपाध्यक्ष आहे.

मातोश्रीवर झालेल्या बैठकीत प्रशांत किशोर यांच्यासोबत लोकसभा निवडणूक प्रचार रणनीतीवर महत्व पूर्ण चर्चा झाल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

‌शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह निलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत, हेमंत गोडसे, अरविंद सावंत, श्रीकांत शिंदे, रामदास कदम, संजय राठोड, शिवाजी आढळराव पाटील, राहुल शैवाळे, चंद्रकांत खैरै, अनंत गीते उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *