Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘मोदी सरकार जात नाही, तोपर्यंत शर्ट घालणार नाही’ नाशिकच्या कृष्णा डोंगरेचा निर्धार

‘मोदी सरकार जात नाही, तोपर्यंत शर्ट घालणार नाही’ नाशिकच्या कृष्णा डोंगरेचा निर्धार

नाशिक: दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी नाशिक जिह्यातील निफाडमध्ये सभा पार पडली. या सभेदरम्यान येवला तालुक्यातील नगरसुल गावचा कृष्णा डोंगरे हा तरुण चक्क अर्धनग्न अवस्थेत शरद पवारांना निवेदन देण्यासाठी स्टेजवर आला. त्याने भाजप सरकार राज्यातून आणि केंद्रातून जात नाही तोपर्यंत आपण कपडे घालणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

मोदी सरकारचा निषेध म्हणून कृष्णा गेल्या दोन महिन्यांपासून अर्धनग्न अवस्थेत फिरत आहे. त्याने जमिनीच्या प्रश्नाकरून काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते, परंतु सरकारने दडपशाही केल्याचा आरोप त्याने केला आहे. त्यानंतर मार्च महिन्यात कृष्णाने आपले कपडे आणि चप्पल पंतप्रधान कार्यालयाला स्पीड पोस्टने पाठवले आहेत. भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांची अवस्था आणखीच बिकट झाल्याचे कृष्णा डोंगरे यांनी म्हटले आहे.

मोदीला घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे आश्वासन शरद पवार यांनी निफाडच्या जाहीर सभेत जनतेला दिले. बळीराजाच्या भल्यासाठी वापरण्यासाठी घडयाळाच्या चिन्हावर बटण दाबून राष्ट्रवादीला विजयी करा असं आवाहनही शरद पवार यांनी केले. निफाड येथील जाहीर सभेत पवारानी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *