Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मायावती १५ कोटींना निवडणूकीचे तिकीट विकतात – मेनका गांधी

मायावती १५ कोटींना निवडणूकीचे तिकीट विकतात – मेनका गांधी

आगामी लोकसभा निवडणुकीतील पहिल्‍या टप्पा जवळ आला आहे. तसतसा पक्षांचा प्रचाराचा जोर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्‍या नेत्या आणि सुल्‍तानपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मेनका गांधी यांनी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्‍यावर तोफ डागली आहे.

मायावती या पैसे घेऊन उमेदवारी देतात, हे सर्व लोकांना माहीत आहे. त्या तिकीटासाठी १५ कोटी रुपये घेतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मेनका गांधी म्‍हणाल्‍या की, बसपात कोणालाच मोफत उमेदवारी मिळत नाही. मायावती या तिकीट विकतात हे सर्वांना माहिती आहे. मायावतींच्‍या पक्षातील लोक हे गर्वांने सांगतात. मायावती तिकीटाच्या मोबदल्यात हिरे किंवा पैसे घेत असल्‍याचे त्‍यांच्‍या जवळच्‍या समर्थकांकडून सांगण्‍यात येते. ती रक्‍कम १५ कोटी असते. तसेच मायावती यांची ७७ घरे आहेत. तसेच त्‍या पुढे म्‍हणाल्‍या की, ज्‍या गरिबांच्‍या गरिबीवर बोलतात हीच मायावातींची माया आहे.”

२०१४ च्‍या लोकसभा निवडणुकीत मेनका गांधी पीलीभीत मतदारसंघातून निवडणूक लढवून संसदेत पोहचल्या होत्‍या. मात्र येत्या निवडणूकित त्‍यांचा मतदारसंघ बदललेला आहे. त्‍या सुल्‍तानपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मेनका यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार डॉ. संजय सिंह अशी लढत आहे. या मतदारसंघात भाजपाचे वर्चस्‍व आहे. सध्या सुल्‍तानपूरचे खासदार वरुण गांधी आहेत. यावेळी ते पीलीभीतमधून निवडणुकीच्‍या रिंगणात उतरले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *