माढ्यात काँग्रेस आमदार जयकुमार गोरेंचा भाजप उमेदवाराला पाठिंबा
माढा: आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना माढ्याची निवडणूक दिवसेंदिवस अधिक मजेशीर होत चालली आहे. माण खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजित निंबाळकर यांना पाठिंबा देणार असल्याचे भव्य कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.
माण खटाव तालुक्यातील बोराटवाडीमध्ये काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा मंगळवारी पार पडला. यावेळी आमदार गोरे बोलत होते. आपण काँग्रेसवर मनापासून
प्रेम करत असलो, तरी आपल्या भागाला पाणी आणण्याच्या कामाची सुरुवात रणजित निंबाळकर यांच्या वडिलांनी केली त्यामुळे आपण निंबाळकरांच्या मागे उभे आहोत असं गोरे म्हणाले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्व माढावासीयांनी भाजपच्या रणजित निंबाळकर यांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
त्यामुळे माढ्याची लढत आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-काँग्रेस अशी होणार आहे.
