Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राहुल गांधीनी आज अमेठीतून निवडणूक अर्ज दाखल केला

राहुल गांधीनी आज अमेठीतून निवडणूक अर्ज दाखल केला

अमेठी: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडसोबतच पारंपरिक मतदारसंघ अमेठीमधूनही लढण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल यांनी आज पारंपरिक अशा अमेठी लोकसभेसाठी निवडणूक अर्ज भरला आहे.

अमेठीमध्ये अर्ज भरण्याआधी राहुल गांधी यांनी रोड शो केला. यावेळी राहुल गांधींसोबत सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित होत्या.

राहुल गांधी यांनी याआधी ४ एप्रिलला केरळमधील वायनाड येथून उमेदवारी अर्ज भरला आहे. अमेठीमध्ये त्यांचा सामना भाजपच्या नेत्या स्मृती इराणींसोबत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात मैदानात उतरल्या होत्या, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *