महाआघाडीला मोठा धक्का देत अखेर राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश निश्चित
मुंबई : काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपप्रवेश अखेर निश्चित झाला आहे. १२ एप्रिलला अहमदनगरमध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील तर १७ एप्रिलला अकलुज येथे होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुलांच्या प्रवेशानंतर आता हे पितादेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काही आमदारही भाजपामध्ये प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ऐन निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश महाआघाडी मोठा धक्का मानला जात आहे.
