Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बिग बॉस मराठीचे स्पर्धक कोण? अक्षरांवरून ओळखा स्पर्धकांची नावं!

बिग बॉस मराठीचे स्पर्धक कोण? अक्षरांवरून ओळखा स्पर्धकांची नावं!

कलर्स वाहिनीवर बिग बॉस मराठीचे पहिले पर्व हिट झाल्यामुळे आता लवकरच बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होत आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याची चर्चा रंगली आहे. लवकरच या कलाकारांच्या नावांची घोषणा होणार असं ट्विट करून कलर्स वाहिनीनं कळवलं होतं. परंतु, आता नव्यानं ट्विट करत या कलाकारांची नवे प्रेक्षकांना ओळखायला सांगितली आहे.

सोमवारी सकाळी सहभागी कलाकारांची नावं कळणार या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांना एक कोडं घालण्यात आलं. ‘स्पर्धकांचं पहिलं अक्षर आम्ही दिलं… आता तुम्ही चालवा डोकं आणि सांगा कोणाची आहेत ही नावं? येऊद्या comments.’ असं ट्विट करण्यात आलं.

यामध्ये वै, आ, सु, चि, अ, प्रा अशी अक्षरे प्रेक्षकांना देण्यात आली आहेत. बिग बॉस मराठीच्या चाहत्यांनी ही नावे ओळखून कमेंट करण्यास सुरूवात देखील केली आहे. त्यामध्ये वैदेही परशुरामी, अक्षया गुरव, चिन्मय मांडलेकर, सुव्रत जोशी, अभिनय बेर्डे, सुयश टिळक या कलाकारांच्या नावाचा निष्कर्ष चाहत्यांनी लावला आहे.

तसेच बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. आता दुसऱ्या सिझनमध्ये देखील तेच या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *