आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी
मुंबई: आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने पहिल्यांदाच नवा उच्चांक गाठला आहे. आज सकाळी १० वाजता सेन्सेक्सने नवा विक्रम प्रस्थापित ३९ हजारांचा टप्पा गाठला आहे. तर निफ्टीही ११ हजार ७०० पर्यंत पोहोचला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
परदेशी गुंतवणूकदारांचा सकारात्मक प्रतिसाद आणि देशांतर्गत चलनाला आलेल्या मजबुतीमुळे सेन्सेक्सने उसळी घेतल्याचं सांगण्यात येत आहे. शेअर बाजारात पीएसयू बँक, ऑटो आणि मेटल इंडेक्सचे भाव वाढले. तसेच टाट मोटर्सच्या शेअरमध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली. सेन्सेक्स ३८,८७१.८७ वर आणि निफ्टी ११,६६९.१५ वर बंद झाला.
