Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जम्मू-कश्मीरमध्ये आरपीएफच्या ताफ्याजवळ कारचा भीषण स्फोट

जम्मू-कश्मीरमध्ये आरपीएफच्या ताफ्याजवळ कारचा भीषण स्फोट

श्रीनगर: पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावरील हल्ल्याची घटना ताजी असताना आज अचानक जम्मू आणि काश्मीरमधील बनिहाल जवळील महामार्गावर एका कारमध्ये स्फोट झाला आहे. हा स्फोट सीआरपीएफच्या ताफ्याजवळ झाला आहे. ह्या स्फोटात कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं नुकसान झाले आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून सीआरपीएफचा ताफा जात असताना जवळच हा स्फोट झाला आहे. हा स्फोट कारमधील सिलेंडरमुळे झाला आहे. या घटनेची अधिक चौकशी केली जात आहे.

बनिहाल जवळ झालेला स्फोट हा घातपात करण्याचा दृष्टीने झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे देशातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *