Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

काँग्रेस ची गुगली, मोदींच्या विरोधात प्रियांका लढणार नाहीत…’या’ उमेदवाराला दिलं तिकीट

काँग्रेस ची गुगली, मोदींच्या विरोधात प्रियांका लढणार नाहीत…’या’ उमेदवाराला दिलं तिकीट

नवी दिल्ली: वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती. खुद्द प्रियंका गांधी यांनी निवडणुकीच्या रिंगणात मोदींविरुद्ध लढण्यास तयार असल्याचे सांगितले होते. मात्र काही वेळा पूर्वी काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची अजून एक यादी जाहीर केली असून या यादीत वाराणसी आणि गोरखपूरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसीतून अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रियांका गांधी निवडणूक लढविणार ही निव्वळ अफवा होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध प्रियंका गांधी यांच्यात सामना रंगणार असल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी वाराणसीहून पंतप्रधान मोदींविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याची चर्चा निवडणुकीच्या रिंगणात जोर धारायला लागली होती. मात्र, प्रियांका वाराणसीमधून लढतील की नाही याबाबतचा सस्पेंस काँग्रेसने कायम ठेवला होता. हा सस्पेंस आज संपला आहे.

वाराणसीची निवडणूक नरेंद्र मोदींसाठी सोपी झाल्याचं बोललं जात आहे. १९ मे ला वाराणसीला मतदान होणार असून २३ मेला सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *