Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

टिकटॉक प्रेमींसाठी खुशखबर! मद्रास उच्च न्यायालयाने अखेर बंदी उठली

टिकटॉक प्रेमींसाठी खुशखबर! मद्रास उच्च न्यायालयाने अखेर बंदी उठली

तरुण पिढी प्रमाणे वयोवृद्धांना सुद्धा वेड लावणाऱ्या टिकटॉकवरची बंदी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने बुधवारी (दि.२४) उठवली. या अॅपवर अश्लील मजकूर अपलोड करण्यात येत असल्याचे कारण देत हायकोर्टाने बंदी घातली होती. मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अॅपवर बंदी घालण्याच्या अंतरीम आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या आदेशानुसार १८ एप्रिलपासून अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर टीक-टॉक अॅप ब्लॉक करण्यात आले होते.

न्यायालयात टिकटॉकच्या वतीने अरविंद दातार यांनी युक्तिवाद करताना, या अॅपवर बंदी घालणे हा तोडगा असू शकत नाही. उलट युजर्सच्या अधिकारांचे संरक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे दातार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तसेच कंपनीचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय या अॅपवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

प्ले स्टोअर आणि गुगल प्लेमधून सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या जगभरातील अॅपमध्ये टीक-टॉक तिसऱ्या स्थानावर होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *