उदयनराजे भोसले यांना राज ठाकरेंचा जाहीर पाठिंबा
सातारा: आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढणार नसल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. शिवसेना-भाजप युतीचा पराभव करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उदयनराजे यांची भेट घेतली आणि जाहीर पाठिंबा दिला या बद्दलची माहिती उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्वांना दिली आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीचे फोटो उदयनराजे भोसले यांनी ट्विटवर शेअर करत असे लिहिलं आहे की, ‘सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला. यावेळी जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.’
राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचे आयोजन केले जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
